Helpline No.: +91-888-888-4499
Select Language : ENGLISH | मराठी
"Every drop matters, be water smart".
न्यू जैन अॅग्रो सर्विसेस बद्दल थोडक्यात पण महत्वाचे :


   न्यू जैन अग्रो सेर्विसिस हि संस्था गेल्या २४ वर्षा पासून औरंगाबाद व जालना जिल्ह्या मध्ये शेतकर्याच्या सेवार्थ काम करत आहे.सर्वोउत्कृष्ट माल, वाजवी दर आणि विक्री पात्चात सेवा ह्या ३ कारणासाठी हि संस्था सर्वत्र नावाजलेली आहे.

   न्यू जैन अग्रो सेर्विसेस या संस्थेचे संस्थापक (founder) श्री. सुभाष चांदमल बेदमुथा यांनी सन १९९२ रोजी हि संस्था चालू केली व त्यामध्ये खते, बियाणे, औषधी व ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सारखे शेती उपयोगी साहित्य विक्रीसाठी ठेवले या व्यवसायातील त्यांची एकनिष्ठता व प्रामाणिकपणा हा वारसा त्यांनी त्यांचे धाकटे चिरंजीव श्री.किशोर सुभाष बेदमुथा यांना दिला व त्यांच्या मनामध्ये रुजवल कि आपला शेतकरी जर सुखी झाला तरच आपण सुखी होऊ शकतो.ज्यादा पैसे कमावण्यासाठी कधीहि पैश्याचा मोह करायचा नाही.

   पुढे चालून श्री किशोर सुभाष बेदमुथा यांनी कमी पडणार्या पर्जान्य मनामुळे शेतीतील भविष्य ओळखून नवीन व्यवसाय चालू केला आणि तो म्हणजे शेततळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी लागणारा ५०० मायकृॉन शेततळे कागदचा. आपल्याला उत्कृष्ट दर्ज्याचा माल देता आला पाहिजे म्हणून त्यांनी एच.डी.पी.ई. फब्रिक उत्पादन व वितरण करणारी जगातील न.१ ची कंपनी इंटरनॅशनल पॅकेजिंग प्रोडक्टस प्रा.लि. या कंपनी ची एजन्सी २०१० साली घेतली.कंपनीचा रायानो मॅट नावाचा दमदार प्रोडक्ट आपल्या संस्थेमध्ये विक्रीसाठी ठेवला.तसेच कंपनीचे (डेप्युटी जनरल मॅनेजर सेल्स) श्री. निलोत्पल मुखर्जी सर व (सिनीअर ऐक्सिकीटीव सेल्स)श्री.रोहित काहंडळ सर यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन दिले.रायनोमॅट या व्यवसायामध्ये या दोन व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे.

   वडिलांनी शिकवलेल्या ३ गोष्ठी "सर्वौत्कृष्ठ माल, वाजवी किंमत, विक्रीपश्चात सेवा" या तीन गोष्टीचा वारसा घेऊन वाटचाल चालू केली आणि ५ वर्षात न्यू जैन अग्रो सेर्विसेस या संस्थेशी हजारो शेतकरी जुडल्या गेले.आणि ते सर्व शेतकरी समाधानी आहे. श्री.किशोर सुभाष बेदमुथा म्हणतात कि मी माझ्या व्यवसायामध्ये माझ्या बदलाचा विश्वास कमावतो. त्यांचे माझ्या बद्दलचे प्रेम कमावतो, त्यांची माझ्या बद्दलची आत्मीयता कमावतो. हा अनमोल वारसा माझे वडील श्री सुभाष चांदमल बेदमुथा यांनी मला दिला आहे आणि मी हा वारसा माझ्या पुढील पिढीला देईल भलेही त्यांचे काम कहीही असो व्यवसाय असो वा नौकरी हा विश्वास, हे प्रेम कायम राहायला हवे.

शेततळ्यासाठी उपलब्ध सुविधा

  • शेततळे खोदकामासाठी २०० एस एल पोकलन मशीन

  • शेततळे फिनिशिंगसाठी ऱोलर मशीन खडे व मुरूम दाबाईसाठी

  • रायनोमॅट ५०० मायकॅन शेततळे कापड
  • किशोर सुभाष बेदमुथा
    (संचालक : न्यू जैन अॅग्रो सर्विसेस)